इवा मेरी

“तिने फायटिंगचा नाद सोडून अ‍ॅक्टिंगवर लक्ष्य द्यावं”

sakal_logo

द्वारे

सुशांत जाधव

अमेरिकन अभिनेत्री ईवा मेरी (Eva Marie) पुन्हा एकदा WWE च्या रिंगणात उतरण्यास तयार झालीये. महिला रेसलर ईवा जवळपास 4 वर्षांपासून WWE पासून दूर होती. मे 2021 मध्ये ती पुन्हा WWE शी जोडील गेलीये. WWE ने तिचे नाव रिलीज करताच अमेरिकन लेखक आणि WWE शी सलग्निंत असलेल्या विंस रूसो (Vince Russo) ने ईवाला मोलाचा सल्ला दिलाय. रेसलिंगच्या रिंगणात परतण्याऐवजी ईवाने अभिनयावर लक्ष्य केंद्रीत करावे, असे मत त्याने व्यक्त केल आहे.

WWE ने ईवा मेरीचे नाव रिलीज करण्यापूर्वीच ती एलेक्सा ब्लिस (Alexa Bliss), डूड्रॉप (Dodroup) या सुपरस्टार्ससोबत स्टोरीलाइनमध्ये दिसली होती. या वृत्तानंतर विंस रूसोने मोठी प्रतिक्रिया दिलीये. तो म्हणाला की, सध्याच्या घडीला ती चित्रपटात काम करण्यात व्यस्त आहे. तिला आता WWE मध्ये रिलीज केले आहे. पण ती सध्या चित्रपटाच्या माध्यमातून चांगली कमाई करतेय. रेसलिंग बिझनेसपासून दूर राहण्यात फायदा आहे, हे तिला देखील कळले असेल, असा दावाही विंस रुसोनं केलाय.

हेही वाचा: विमानतळावर हार्दिक पांड्याची 5 कोटींची घड्याळं जप्त

हेही वाचा: फेडररसाठी बावीसावं वरीसही ठरणार धोक्याच!

WWE मध्ये ईवा मेरीने टेलिव्हिजनवर एकूण 7 लढती खेळल्या आहेत. ईवाने आपली शेवटची लढत ही 20 सप्टेंबर 2021 रोजी Raw च्या एपिसोडमध्ये खेळली होती. यात डूड्रॉपने तिला नमवले होते. WWE मध्ये ईवा मेरीचा योग्य पद्धतीने उपयोग करुन घेतला जात नाही, असेही रूसोला वाटते.

रेसलिंग क्रीडा प्रकार ही ईवाचा आवडता छंद आहे. तिच्या अनेक स्वप्नापैकी रेसलिंगला ती निश्चितच अधिक प्राधान्य देते. तिच्या या विचारांचा आदर वाटतो. पण सध्याच्या घडीला तिला चित्रपट आणि जाहिरातीमध्ये खूप काही करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यामुळे तिने रेसलिंगचा नाद सोडून अभिनयावर अधिक भर द्यायला पाहिजे, असे वाटते, असे असे विंस रूसोने म्हटले आहे.

2019 मध्ये अमेरिकेतील बिग बॉस रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्यानंतर ईवा मेरी चर्चेत आली होती. या स्पर्धेत ती सातव्या क्रमांकावर राहिली होती. ती पेशावर रेसलर असून 37 वर्षीय ईवा मेरीचे इंस्टाग्रामवर 5 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. WWE ने तिचे नाव रिलीज करण्यापूर्वीच ती WWE मधील सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या सुपरस्टार्सच्या यादीत आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here