शेअर मार्केट
sakal_logo

द्वारे

कृष्णा जोशी

मुंबई : परस्परविरोधी देशी आणि जागतिक संकेतांमुळे आज भारतीय शेअरबाजार (Indian share Market) किरकोळ वाढ दाखवीत बंद झाले. सेन्सेक्स (Sensex) 32.02 अंश तर निफ्टी (Nifty) 6.70 अंश वाढला. आज सकाळी जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअरबाजार वाढ दाखवीत उघडले. चीन व जपानची आर्थिक वाढ (china and japan) चांगली होत असल्याच्या आकडेवारीमुळे सर्वत्र उत्साह होता.

हेही वाचा: शंभरी पार करणारा जाणता शिवशाहीर हरपला – रामदास आठवले

त्यामुळे सकाळी सेन्सेक्स 61 हजारांवर गेला होता, मात्र नंतर नफावसुलीमुळे तो घसरत गेला. धातूनिर्मिती आणि वाहननिर्मिती उद्योग तसेच सरकारी बँकांच्या शेअरचे भाव कमी झाले. दिवसअखेरीस सेन्सेक्स 60,718.71 अंशांवर तर निफ्टी 18,109.45 अंशांवर बंद झाला.

आयटीसी (बंद भाव 238 रु.), नेस्ले, एशियन पेंट, कोटक या शेअरचे भाव एक ते दोन टक्के वाढले. हिंदुस्थान युनिलीव्हर, टीसीएस, डॉ. रेड्डीज लॅब यांचे भावही वाढले. तर दुसरीकडे टाटा स्टील 41 रुपयांनी घसरून 1,245 रुपयांवर आला. बजाज ऑटो (3,605), महिंद्र आणि महिंद्र (928), स्टेट बँक, एअरटेल, लार्सन टुब्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे भाव कमी झाले.

आजचे सोन्याचांदीचे भाव

सोने – 48,930 रु

चांदी – 66,400 रु



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here