पाणीपुरवठा
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कंत्राटी सफाई कामगार, हाऊस कीपिंग, खासगी सुरक्षा रक्षकानंतर आता महापालिकेच्या पाणी खात्यातही खासगीकरणाची चाहूल लागली आहे. जलमापकांच्या नोंदीसाठी महापालिका खासगी कंपनी नियुक्त करणार आहे. पाणीपट्टी हा महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असून त्यातून दोन हजार कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न महापालिकेला मिळते.

मुंबईत जवळपास चार लाख जलमापके आहेत. त्यातील निम्मी जलमापके झोपडपट्ट्यांमध्ये आहेत. या जलमापकांच्या नोंदीवरून पाणीपट्टी आकारली जाते. या नोंदी आतापर्यंत पालिकेचे कर्मचारी घेत होते; मात्र आता खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या असून ४३ लाख ५२ हजार रुपयांचा खर्च अंदाजित आहे. पहिल्यांदाच अशाप्रकारे खासगी कंपनीमार्फत जलमापकांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. पाणीपट्टी हा महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रेत आहे. महापालिकेला त्यातून वर्षाला साधारण दोन हजार कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळते. हे उत्पन्न पूर्णपणे जलमापकांच्या नोंदीवर अवलंबून आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या कामासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली जात असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पालिकेत खासगीकरणाचा असा झाला शिरकाव…

सुरुवातीला पालिकेत खासगीकरणाची सुरुवात सफाई कामगारांच्या नियुक्तीपासून झाली.नागरी सुविधा केंद्राची जबाबदारीही खासगी कंपनीवर देण्यात आली.पालिका इमारतींच्या दैनंदिन देखभालीची जबाबदारी पूर्वी पालिकेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी करायचे, पण आता मुख्यालयासह, शाळा तसेच अनेक इमारतींच्या देखभालीसाठी हाऊस कीपिंग कंपन्यांची मदत घेतली जाते.रुग्णालयात अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची गरज निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य सुरक्षा बोर्डाचे जवान नियुक्त करण्यात आले. त्यानंतर अनेक इमारतींसाठी खासगी कंपन्यांचे सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आले. अशाप्रकारे टप्प्याटप्प्याने पालिकेच्या सेवेत खासगी कंपनीचा शिरकाव होऊ लागला.

मुलुंडपासून सुरुवात

खासगी कंपनीमार्फत पहिल्यांदा प्रायोगिक तत्त्वावर जलमापकांच्या नोदींची सुरुवात मुलुंड टी वॉर्डच्या हद्दीत केली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास तो संपूर्ण मुंबईत राबवला जाणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here