
5 तासांपूर्वी
– सुशांत सावंत
मुंबई: “मोदींच्या (Pm modi) नेतृत्वाला आणखी एक परिमाण मिळाले. ते सलग 20 वर्ष राज्य आणि देशाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. गरीबालाही वाटते ते आमच्यातून आलेत, सैनिकांना देखील वाटते की हे आपल्यातून आलेत. भारताच्या विविध ठिकाणी वर्षानुवर्षं रखडलेले प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेत” असे भाजपा नेते प्रकाश जावडेकर (Prakash javdekar) म्हणाले. “ज्यांनी 150 वर्ष भारतावर राज्य केले, त्या ब्रिटनच्या पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. मोदींच्या लोकप्रियतेचे माप संपूर्ण जगात आहे” असे जावडेकर म्हणाले.
“काँग्रेसप्रणीस संपुआने 70 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी केली. पण मोदींनी 7 लाख करोड शेतकऱ्यांच्या खात्यात योजनेच्या माध्यमातून जमा केले. आज 80 देशांना भारताने लस पुरवली. आता चार हजार ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता भारताला बाहेरून ऑक्सिजन आणावे लागणार नाही” असे जावेडकर म्हणाले.
हेही वाचा: चित्र काढताना बोरिवलीतल्या हेत्वीसोबत घडली दुर्देवी घटना
“मास्क नको म्हणून इतर देशात निदर्शने झाली पण आपल्या देशात नाही झाली. चार कोटी घरात वीज कनेक्शन, 50 कोटी लोकांसाठी आयुष्यमान भारत असे एकापेक्षा एक योजना आणल्या. बेटी बचाव बेटी पढाव आणि स्वच्छ भारत अभियान मोदींनी राबवले” अशा शब्दात जावडेकरांनी मोदींचे कौतुक केले. “शिवसेना देखील मोदींचा फोटो लावून निवडून आली आणि मग त्यांनी गद्दारी केली” अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.
Esakal