रात्र असूनही जाखडी नृत्य स्पर्धेला प्रेक्षकांनी लक्षणीय उपस्थिती लावली.
प्रेक्षकांच्या गर्दीत आणि परीक्षांच्या आदेशाने नृत्य स्पर्धेला सुरवात करण्यात आली.
महालक्ष्मी कलापथक पाले, (ता.मंडणगड) यांनी प्रथमच स्पर्धेत सहभाग नोंदवत अप्रतिम सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विविध रंगांचे आकर्षक वेष परिधान करून नृत्याचा अविष्कार सादर करण्यात आला.
कोरोना जागृतीचा संदेश देताना भैरवनाथ प्रासादिक कला पथक गांधीचौक तुरेवाडी मंडणगड यांनी कोरोना योध्याना सलाम केला.
नृत्यात मारण्यात येणाऱ्या नृत्य प्रकार चालींचे बारीक निरीक्षण करताना परीक्षक शाहीर अनंत येलमकर बुवा व अन्य
रात्रभर रंगलेल्या स्पर्धेतील कलाकारी पाहण्यासाठी प्रेक्षक आपल्या जागेवर खिळून बसले.
दिवस उगवणीला आला असताना पहाटे सात वाजता स्पर्धेतील शेवटचे सादरीकरण करणारे चांभारखिंड कला पथक
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवलेल्या अमर नाच मंडल करंजखोल ता. महाड, यांना रोख रुपये ५ हजार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी देवून सन्मानित करताना कलगी तुरा समाज उन्नती मंडळाचे पदाधिकारी.
द्वितीय क्रमांक मिळविलेल्या भैरवनाथ प्रासादिक कला मंडळ यांना रोख रुपये ३ हजार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी देवून गौरविताना आयोजक.

तृतीय क्रमांक रोख रुपये २ हजार सन्मानपत्र, सन्मानचिन्ह विजेते भैरीभवानी नृत्य कला मंडळ भवानी नडगाव यांना गौरविण्यात आले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here