बिनशर्त निलंबन मागे घेण्याची मागणी
sakal_logo

द्वारे

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड एसटी आगारातील एका महिला वाहकासह एकूण पंधरा कर्मचार्यांचे निलंबन बिनशर्त मागे घेण्याची मागणी संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचार्यांनी केली आहे. संप काळात व्हॉट्सअप ग्रुप व इतर प्रसिध्दी माध्यमांद्वारे चिथावणीखोर वक्तव्य करून त्या आशयाचे स्टेटस ठेवल्याचा ठपका ठेवत या कर्मचार्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.

एसटीचे पुणे विभागाचे नियंत्रक यांच्याकडे दौंड आगारातील कर्मचार्यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी दौंड एसटी आगारातील १६३ कर्मचारी ८ नोव्हेंबर पासून संपात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा: सहकारी संस्थेच्या प्रगतीनुसार शेअर्समध्ये वाढ व्हावी : अनास्कर

त्यापैकी ७ चालक , ५ वाहक, ०१ महिला वाहक, ०१ वाहन परीक्षक व ०१ सहायक कारागीर, असे एकूण १५ कर्मचार्यांना ११ व १२ नोव्हेंबर रोजी निलंबित करण्यात आले आहे. कामावर गैरहजर राहणे, इतर कर्मचार्यांना कामावर जाण्यास मज्जाव करणे, आगारातील औद्योगिक शांतता भंग करणे, आदी स्वरूपाचे ठपके निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

सदर निलंबनाविषयी एसटी कर्मचार्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सनदशीर मार्गाने शांततेत आंदेलन करत असताना सुडबुध्दीने ठराविक कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आल्याचा दावा कर्मचार्यांनी केला आहे. प्रशासनाने सदर निलंबन बिनर्शत मागे घ्यावे किंवा दौंड आगारातील सर्व कामागारांचे एकत्रितपणे निलंबन करण्याची मागणी कर्मचार्यांनी केली आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here