दिलीप वळसे
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाशी लढत लढत आपण पूर्वपदावर आलो आहेत. विपरीत विचार कुणी करू नसे. महाराष्ट्रातील परिस्थिती आता आटोक्यात आहे. कुणातरी कशाच्या तरी फायद्यासाठी राज्यात‌ हिंदू-मुस्लिम जातीय तेढ निर्माण करू नका, असा टोला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रातील दंगली भाजप घडवीत असल्याचा आरोप केला जात आहे. वळसे पाटील यांनी कुणाचेही नाव न घेता या प्रकरणी सूचक भाष्य केले आहे. दंगलीच्या मागे कोण आहे, याचा शोध राज्य सरकार घेणार आहे. अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संघटना माथी भडकविण्याचे काम करीत आहेत. यासंबंधी अतिरिक्त मुख्य सचिव आणि पोलिस दलाला सूचना दिल्या आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचा: कंगना पुन्हा बरळली; स्वातंत्र्य, भीक आणि नेताजी बोस-भगतसिंगांबद्दल म्हणाली…

कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणातील आरोपी के. पी. गोसावी सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे संबंध आहेत, असे पत्र मोहित कंबोजने गृहमंत्रालयाला पाठविले आहे, या प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले, की ते पत्र मिळाले, तर चौकशी करू.

वळसे पाटील म्हणाले, ‘‘त्रिपुरातील घटनेचे पडसाद उमटले. आता परिस्थिती नियंत्रणात असली, तरी या घटनांवर पोलिस लक्ष ठेऊन आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.’’

हेही वाचा: पुणे : एकरकमी एफआरपी न दिल्यास आंदोलन सुरूच राहणार

महाराष्ट्रातील परिस्थिती आटोक्यात

‘हिंदू आता मार खाणार नाहीत,’ अशी प्रक्षोभक विधाने काही नेते करीत आहेत, या प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले, ‘‘काही लोकांचा हा अजेंडा आहे. पण महाराष्ट्रातील परिस्थिती आटोक्यात आहे. कुणीही जातीय तेढ निर्माण करू नये. हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडण लावू नये.’’



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here