कोरोना अपडेट
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.१६) दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत दिवसात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १५४ जण कोरोनामुक्त झाले असून याउलट दिवसभरात २०१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: पुणे आणि परिसरात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात

मंगळवारी दिवसभरात आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील सर्वाधिक ९६ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ३७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५९, नगरपालिका हद्दीत सात आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात दोन नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर व पिंपरी चिंचवडमधील प्रत्येकी एका तर, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन मृत्यूचा समावेश आहे. दिवसात नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

हेही वाचा: कोरोनाबाबत माहिती न देणं पडलं महाग; ‘ॲमझॉन’ला पाच लाखांचा दंड

जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४६, पिंपरी चिंचवडमधील ४७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील पाच जण आहेत. दिवसभरात नगरपालिका हद्दीतील एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही. जिल्ह्यात सद्यःस्थितीत एकूण २ हजार ३८ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी १ हजार ६५ जणांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरू असून, उर्वरित ९७३ जण गृह विलगीकरणात आहेत.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here