ऋषभ पंत

Ashes : ऐकलं का? इंग्लंडचा स्फोटक फलंदाज घेतोय पंतकडून प्रेरणा!

sakal_logo

द्वारे

सुशांत जाधव

क्रिकेटच्या मैदानातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा स्टार खेळाडू जोस बटलर (Jos Buttler) कसून सराव करत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बेधडक खेळण्यासाठी तो ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) खेळीतून प्रेरणा घेत आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दमदार कामगिरी केली होती. यावेळी ऋषभ पंतने जबरदस्त खेळी करुन भारतीय संघाच्या मालिका विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी आणि ब्रिस्बेनमधील अखेरच्या दोन सामन्यात 24 वर्षीय पंतने दुखापतीने त्रस्त झालेल्या संघाला मोठा दिलासा दिला होता. पंतच्या दिमाखदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पिछाडीवरुन ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाचा दणका दिला होता. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानात 2-1 अशी मात दिली होती. यात पंतने पाच डावात 68.50 च्या सरासरीने 274 धावा केल्या होत्या.

हेही वाचा: क्रिकेटसाठी कायपण! ऑलिम्पिकसाठी ICC नं खेळला मास्टर स्ट्रोक

जोस बटलरने ‘डेली टेलीग्राफ’ला एक खास स्तंभ लिहिलाय. यात त्याने लिहिलंय की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने जो विजय मिळवला होता त्यावेळी ऋषभ पंतच्या खेळी पाहण्याचा आनंद घेतला होता. सावध आणि आक्रमक याचा कमालीचा समतोल राखून पंतने बेधड कामगिरी केली होती. ज्या विकेट किपरला अधिक सकारात्मक रहायचे आहे त्याने पंतकडे पाहावे. त्याची मानसिकता कमालीचे असते. आक्रमक आणि सावध पवित्रा यात तो कमालीचा समतोल साधतो, असे म्हणत बटलरने पंतवर कौतुकाचा वर्षाव केलाय.

हेही वाचा: बळजबरीनं पाजली दारू ; क्रिकेटरचे धक्कादायक खुलासे

जोस बटलर इंग्लंडच्या संघातील अन्य सदस्यांसह अ‍ॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. दोन आठवड्यांच्या क्वारंटाईन कालावधीनंतर बटलरसह संघातील खेळाडू ब्रिस्बेनच्या मैदानातून सुरु होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सराव सुरु करतील.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here