परदेशात शिकताना... : पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि करिअर

परदेशात शिकताना… : पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि करिअर

sakal_logo

द्वारे

राजीव बोस

आपल्याला डिजिटल जाळे म्हणजेच ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’बद्दल माहिती आहेच. त्यातून स्मार्ट मशिन्स तयार झाल्या असून, आपण आता स्मार्ट शहरांच्या दिशेने प्रवास करतो आहोत.

आपल्याला माहितीच्या भडिमाराला सातत्याने मिळत असलेल्या महत्त्वाबद्दलही माहिती आहे आणि ही माहिती सतत आपल्या आजूबाजूला फिरत असते. अशी अनेक तंत्रे विकसित झाली आहेत, ज्याद्वारे माहिती गोळा करणे, ती हाताळणे, तिच्यावर प्रक्रिया करणे या सर्व गोष्टी अत्याधुनिक व स्मार्ट पद्धतीने करणे सोपे झाले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) सामर्थ्याचा वापर करून जगभरात पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये अनेक नवे शोध लागले आहेत. त्यातून नागरिकांना वापरण्यास अत्यंत सुलभ, परिणामकारक, वेगवान उत्पन्न देणारे, दणकट, स्मार्ट उत्पादने विकसित करता आली आहेत. आपण पाहतोच आहोत, की मानवी बुद्धिमत्तेपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता काही ठिकाणी अधिक परिणामकारक व उपयुक्त असल्याचे दिसून आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने सज्ज असलेले संगणक अनेक प्रश्‍नांवर मानवापेक्षा अधिक वेगाने आणि परिणामकारकतेने उत्तरे शोधताना दिसत आहेत. ते न थकता, सतत काम करू शकतात व त्यांच्या प्रश्‍न सोडविण्याच्या क्षमतेवर भावभावना किंवा इतर मानवी कमतरतांचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. ‘इंटेलिजंट कंट्रोल’ या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर नियंत्रण ठेवणाऱ्या आधुनिक नियंत्रण व्यवस्थेमुळे हे क्षेत्र अधिक परिणामकारक बनले आहे.

वीजनिर्मितीपासून, दळणवळण व दूरसंचार, स्वयंपाकघरातील वापराच्या वस्तू यांमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा वापर होतो आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू व त्यांवर काम करणाऱ्या अभियंत्यांचे कष्ट आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्सचा उपयोग वैश्‍विक इंडस्ट्रीपासून सामाजिक उपक्रमांपर्यंत सर्वत्र आढळून येतो. त्यामुळे या क्षेत्रातील संशोधने वाढत जातील, तसे हे क्षेत्र अधिकाधिक वेगाने वाढतच जाणार आहे. या क्षेत्रात संशोधन आणि विकासाच्या संधीही त्या प्रमाणात उपलब्ध होत जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स अशा प्रकारच्या संशोधन आणि विकासातून नव्या संकल्पना विकसित करतात आणि त्यातून विविध उत्पादनांची निर्मिती होताना दिसते. प्रश्‍न सोडविण्याची जबरदस्त क्षमता, विश्‍लेषणात्मक बुद्धी यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्सना तंत्रज्ञानाचे उद्‍गाते म्हटले जाते. या क्षेत्रात शिक्षण आणि संशोधनाचे काम केलेल्या विद्यार्थांना भविष्यात मोठी मागणी असणार आहे. परदेशात या क्षेत्रातील शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत व हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पॉवर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सहज उपलब्ध आहेत.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here