दोन कोटींची खंडणी
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर : शहरातील श्रीराम मंदिर चौक परिसरातील एका सुवर्णव्यावसायिकास सोमवारी (ता.१५) मोबाइलवरुन अज्ञात व्यक्तीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागीतली. तसेच पैसे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील एका इमारतीत घेऊन येण्याचे सांगितले. सुवर्णव्यावसायिकाने या प्रकरणी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: अकोला : सभापती निवडणुकी विरोधात पुढील सुनावणी ३० नोव्हेंबरला

शहरातील अमोल प्रकाश महाले यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानंतर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरास तातडीने भेट देवून शहर पोलिसांच्या मदतीने तपास सुरू केला. पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाची माहिती घेतली असता, तो विळद घाट (ता. नगर) येथील एका पंक्चर दुकानदाराचा असून, तो मागील काही दिवसांपूर्वी चोरीस गेल्याचे समोर आले. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here