लग्न
sakal_logo

द्वारे

संघ-इश

अलाहाबाद : सरकारची परवानगी न घेता पहिली पत्नी जिवंत असताना पुनर्विवाह केल्याचे आढळले. यानंतर आरोपीला शिक्षा करणार किंवा नाही, सरकारी कर्मचाऱ्याच्या नियम 29 उल्लंघन केल्यानंतर राज्य लोकसेवा न्यायाधिकरणाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने (allahbad high court) स्पष्ट नकार दिला आहे. यावर कोर्टाने सांगितले….

गैरसमजामुळे याचिकाकर्त्याने सुरुवातीला चुकीची माहिती दिली

सहारनपूरच्या मनवीर सिंह यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती एसपी केसरवानी आणि न्यायमूर्ती विकास यांच्या खंडपीठाने बुधवारी हा आदेश दिला आहे. गैरसमजामुळे याचिकाकर्त्याने सुरुवातीला चुकीची माहिती दिली पण नंतर योग्य माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 1970 मध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले याचिकाकर्ते डिसेंबर 2004 मध्ये निवृत्त झाले. यानंतर 28 जून 2005 रोजी शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधिकरणाने 2 सप्टेंबर 2021 रोजी खटलाही फेटाळला होता.

हेही वाचा: Malegaon : दंगल पू्र्वनियोजित? रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे

ज्यासाठी तो शिक्षेस पात्र

सुनावणी दरम्यान, अलाहाबाद हायकोर्टानं म्हटलं की, “राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 अन्वये अंगभूत अधिकारांच्या वापराला निश्चित मर्यादा आहे. याचिकाकर्त्यावर नियमांचे उल्लंघन करून विभागाची दिशाभूल केल्याचा आरोप पुराव्यांवरून आणि वस्तुस्थितीवरून सिद्ध झाला आहे. ज्यासाठी तो शिक्षेस पात्र आहे. निवृत्तिवेतन जप्त करण्याच्या विभागाचा आदेश योग्य असल्याचं सांगत न्यायालयानं याचिका फेटाळली आहे.

हेही वाचा: ‘पार्ट टाइम मुख्यमंत्री’ या भाजपच्या टीकेला शरद पवारांचे उत्तरEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here