
राष्ट्रपती भवनात असलेल्या कडक सुरक्षा व्यवस्थेची नजर चुकवून एक दाम्पत्य गेटवरून आत घुसले होते.
5 तासांपूर्वी
राष्ट्रपती भवनात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात असलेल्या कडक सुरक्षा व्यवस्थेची नजर चुकवून एक दाम्पत्य गेटवरून आत घुसले होते. दोघांनाही दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला होता. या प्रकरणी पुरुष आणि महिला अशा दोघांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ही कारवाई केली. दारुच्या नशेत त्यांनी हे कृत्य केलं असल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितले. कारमधून त्यांनी राष्ट्रपती भवनात घुसण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा: अधिकाऱ्यांनो सरकारी कॉलनीत रहा आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा – SC
राष्ट्रपती भवानत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नाबद्दल त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करण्यात आली होती. तेव्हा विचारलेल्या प्रश्नांना ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नव्हते. शेवटी त्यांना अटक करण्यात आली. दारुच्या नशेत त्यांनी हे कृत्य केले असले तरी अधिक तपास केला जात आहे.
Esakal