
विराट, रोहित, राहुलला स्थान नाही; पाहा Playing XI
5 तासांपूर्वी
T20 World Cup Team of the Tournament : भारतीय संघाचे टी२० विश्वचषक स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीत संपुष्टात आले. सुपर-१२ फेरीत भारताने पाचपैकी तीन सामने जिंकले पण भारताच्या गटातील न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांनी अधिक चांगली कामगिरी केल्याने ते सेमीफायनलमध्ये गेले. उपांत्य फेरीत पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने धूळ चारली तर न्यूझीलंडने इंग्लंडचा पराभव केला. अखेर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना जिंकत टी२० विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने एक संघ निवडला. महत्त्वाची बाब म्हणजे, या संघात भारतापेक्षाही पाकिस्तानच्या जास्त खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
हेही वाचा: सौरव गांगुलीला ICC मध्ये मिळाली मोठी जबाबदारी; वाचा सविस्तर

हरभजन-सिंग
हरभजनच्या संघात पाकिस्तानचे सर्वाधित तीन खेळाडू आहे. भारत आणि न्यूझीलंडचे दोन खेळाडू आहेत. तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेच्या प्रत्येकी एका खेळाडूला संघात स्थान मिळाले आहे. त्याने सलामीवीर म्हणून डेव्हिड वॉर्नर आणि मोहम्मद रिझवान या दोघांना स्थान दिले आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी कर्णधार केन विल्यमसनला तर चौथ्या स्थानासाठी यष्टीरक्षक जोस बटलरला संघात स्थान मिळाले आहे. पाचव्या क्रमांकासाठी एडन मार्क्रमचा समावेश करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून वनिंदू हसरंगा, असिफ अली आणि रविंद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे. तर वेगवा गोलंदाज म्हणून शाहीन शाह आफ्रिदी, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह असा तगडा संघ त्याने निवडला आहे. या संघात १२वा खेळाडू म्हणून राशिद खानची हरभजनने निवड केली आहे.
हेही वाचा: न्यूझीलंडला मोठा धक्का; स्टार खेळाडूची T20 मालिकेतून माघार

रोहित-शर्मा-विराट-कोहली-ऋषभ-पंत
यष्टीरक्षक – जॉस बटलर
फलंदाज – डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया), मोहम्मद रिझवान (पाकिस्तान), केन विल्यमसन (कर्णधार – न्यूझीलंड), एडन मार्क्रम (दक्षिण आफ्रिका)
अष्टपैलू – वनिंदू हसरंगा (श्रीलंका), असिफ अली (पाकिस्तान), रविंद्र जाडेजा (भारत)
गोलंदाज – शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), जसप्रीत बुमराह (भारत)
१२वा खेळाडू – राशिद खान (अफगाणिस्तान)
Esakal