
5 तासांपूर्वी
इराण : इराणच्या तेल पाइपलाइनचा आज (ता.17) भीषण स्फोट झाला. ही घटना देशाच्या दक्षिण भागात घडली आहे. खुजेस्तान प्रांतातील रामिस या इराणी गावात बुधवारी सकाळी स्फोट झाला, असे इराणी वृत्तपत्र तस्नीमने म्हटलं आहे. इराणमध्ये गेल्या 12 महिन्यांत आगी आणि स्फोटांच्या अनेक घटना घडल्या आहेत.
हेही वाचा: “पंतप्रधान मोदीही गांधींपासून प्रेरीत”,भाजपनं कंगनाला फटकारलं
जुन्या पायाभूत सुविधांमुळे पाइपलाइनची झीज झाली होती आणि ती आज फुटली. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, परिसरात भूकंपासारखा धक्क जाणवला. आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे वृत्त समोर आलेलं नाही.
Esakal