लोखंडी सूट तयार करुन झाला 'आयर्न मॅन'; आनंद महिंद्रांनी पाळला शब्द

लोखंडी सूट तयार करुन झाला ‘आयर्न मॅन’; आनंद महिंद्रांनी पाळला शब्द

sakal_logo

द्वारे

टीम इ सकाळ

मुंबई – मणिपूरच्या प्रेम निनगोमबमनं आयर्न मॅनचा सूट तयार केला होता. त्याचा व्हिड़िओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ जेव्हा देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पाहिला तेव्हा ते प्रभावित झाले होते. कुठलीही सुविधा नसताना प्रेमनं केलेली कामगिरी त्यांना कमालीची आवडली होती. त्यांनी त्याला तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यास सांगितले होते. आणि एक वचनही दिलं होतं. प्रेमनं आपलं काम पूर्ण केलं. आणि महिंद्रा यांनी देखील आपला शब्द पाळला आहे. याबाबत महिंद्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे.

प्रेम हा तेव्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. त्याचे कारण म्हणजे त्यानं आनंद महिंद्रा यांनी त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ शेयर केला होता. प्रेमनं एक लोखंडी सुट तयार केला होता. त्यानं मार्वलच्या सीरिजची प्रेरणा घेऊन तो सूट तयार केला होता. त्यातून त्यानं लोखंडी आयर्न मॅनचा सुट बनवला होता. त्यानं त्यासाठी एका भंगाराच्या दुकानातून लोखंड गोळा केलं. आणि त्याच्या मदतीनं तो सूट तयार केला होता. त्या सूटचं वैशिष्ट्य म्हणजे तो रिमोटवर चालणारा सूट होता. प्रेमनं जेव्हा त्याचा व्हि़डिओ सोशल मीडियावर शेय़र केला तेव्हा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

प्रेमनं जी कामगिरी केली त्यामुळे आनंद महिंद्रा प्रभावित झाले होते. त्यांनी त्याचं कौतूक करायचं ठरवलं. त्याच्या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी आणि त्याचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांनी त्याला मदतीचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला मदत करण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर त्यांची पूर्ण टीम ही प्रेमच्या घरी गेली. त्या ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी प्रेमच्या कुटूंबियासमवेत मोठ्या प्रेमानं बातचीत केली. त्याच्याशी संवाद साधला. त्यामुळे त्याचे कुटूंबिय देखील प्रभावित झाले होते. आनंद महिंद्रा यांनी प्रेमला इंजिनिअरींगचं शिक्षण घेण्यासाठी हैद्राबादला पाठवलं आहे.

हेही वाचा: विक्रम गोखलेंची 10 धक्कादायक वक्तव्यं…; एकदा वाचाच

हेही वाचा: कंगना काय चुकीचं बोलली, माझ्याकडे पुरावे : विक्रम गोखलेEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here