
5 तासांपूर्वी
बेळगाव : अशोकनगर येथील ईएसआयच्या रुग्णालयात अनेक समस्या आहेत. मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने त्याच ठिकाणी पार्किंग केले जात होते. यासंबंधी ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. याची दखल घेत ईएसाय रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयाच्या आवारात दुचाकी वाहन पार्किंग करण्यास सोपे झाले आहे. यामुळे रुग्णांतून समाधान व्यक्त होत आहे. ईएसआय रुग्णालयाने मुख्य प्रवेशद्वार पुन्हा बंद करू नये अशी मागणीही कामगार व रुग्णांतून केली जात आहे.
‘सकाळ’मध्ये गुरुवार ४ नोव्हेंबरच्या अंकात ‘ईएसआय रुग्णालयात समस्यांचा डोंगर’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली होती. यामध्ये प्रवेशद्वारातच पार्कींग होत असल्याचे मांडले होते. याकडे ईएसआय प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात आली होती. याची दखल घेत अखेर प्रवेशद्वार खुले करण्यात आले आहे.
हेही वाचा: Belgaum : सक्तीने करण्यात आलेल्या बदल्या अखेर रद्द
अशोकनगर येथे ईएसआयचे मुख्य रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या आवारात पार्किंगसाठी मोठी जागा असूनही मुख्य प्रवेशद्वार (गेट) बंदच असते. यामुळे उपचारासाठी गेलेल्या रुग्णांना नेहमी मुख्य प्रवेशद्वारावरच वाहने लावावी लागतात. काही जणांकडून रस्त्यावर वाहने लावली जात होती. यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडीही होती. यामुळे हे प्रवेशद्वार खुले करून रुग्णालयाच्या आवारात पार्किंग करण्यास जागा उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी केली जात होती. मात्र, ईएसआय कार्पोरेशन याकडे दुर्लक्षच करत होते. अखेर सकाळमध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
Esakal