कल्याण गुन्हा
sakal_logo

द्वारे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : कल्याण फोर्टीस हॉस्पीटल (Fortis hospital) परिसरात मुंगूसची शिकार (Mongoose Hunt) केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. स्थानिक नागरिकांनी ही बाब बाजारपेठ पोलिसांच्या लक्षात आणून दिली. बाजारपेठ पोलीसांनी (kalyan police) याप्रकरणी चार जणांना अटक (culprit arrested) केली. कल्याण वन खात्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला असून आरोपींना पोलीस कोठडी (police custody) सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा: मुंबई : एफआयआयएच कोर्समधील डॉक्टर कोरोना पॉझिटीव्ह

मुंगूसचे तेल सांधेदुखीवर औषध म्हणून वापरले जाते. तसेच मुंगूसच्या केसाचा वापर ब्रश बनविण्यासाठी होतो. याला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने आरोपींनी मुंगूसची शिकार केली असावी असा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

संजू समय्या मोटम (वय 32), भोलानाथ शंकर पास्तम (वय 30), जलाराम समय्या पास्तम (वय 32), बसवय्या शंकर पास्तम (वय 32) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व मांडा टिटवाळातील वासुंद्री रोड परिसरात राहणारे आहेत. आरोपींना एक दिवसीय वन खाते पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी सांगितले.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here