
5 तासांपूर्वी
कात्रज : कात्रज कोंढवा रस्त्याचे सुरू असलेले काम, रस्त्यांवर पडलेले खड्डे, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक आदी कारणांमुळे कात्रज कोंढवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे दिसून येत असून वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा: ‘काशी-मथुरा बाकी है!’ मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी
पोलिसांकडून बंदोबस्त ठेवत वाहतूक नियमनावर भर दिला जात असला तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे संध्याकाळच्यावेळी तर होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये वाहन चालकांव दीड ते दोन तास या वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येते. रस्ता अरुंद असून सायंकाळी ५ ते ९ या वेळात तर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या काळात रस्त्यांवरून तासी १० हजारांहून अधिक वाहनांची येजा होते.
हेही वाचा: राज्यात रुग्णसंख्येत अंशत: वाढ; तर 32 रुग्णांचा मृत्यू
या उपाययोजनांची गरज
-
रस्त्यांवरील छोटे-मोठे खड्डे त्वरित बुजवावे
-
वाहतूककोंडीच्या वेळात अवजड वाहनांना मनाई करावी
-
रस्त्यांवर उभ्या करण्यात येत असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी
“कात्रज-कोंढवा रस्त्यांवर प्रवास करणे कठीण झाले आहे. सायंकाळच्या वेळी या रस्त्यार किमान अर्धा ते एक तास अडकून राहावे लागते. प्रशासनाने कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.”
– तेजस शिंदे, वाहनचालक
“कात्रज ते खडी मिशन चौकापर्यंत दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडते याचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. त्यातच रस्त्यावर जागोजागी मोठे मोठे खड्डे आहेत त्यामुळे अनेकवेळा अपघातही होतात. गेल्या अनेक वर्षापासून प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.”
– विनोद रांजणे, स्थानिक नागरिक
Esakal