मोहम्मद सिराज

IND vs NZ : जखमी वाघ! सिराजनं हाताला पट्टी बांधून टाकली बॉलिंग

sakal_logo

द्वारे

सुशांत जाधव

India vs New Zealand T20, 1st Match: जयपूरच्या मैदानातून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली. पहिल्या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सवाई मानसिंह क्रिकेट स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium, Jaipur) रंगलेल्या सामन्यात भारतीय टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

न्यूझीलंडच्या डावातील अखेरच्या षटकात भारतीय संघातील युवा आणि प्रतिभावंत गोलंदाज असलेल्या मोहम्मद सिराजला दुखापत झाल्याचे पाहयला मिळाले. वेदना बाजूला ठेवून सिराजने हाताला पट्टी बांधून ओव्हर पूर्ण केल्याचे पाहायला मिळाले. त्याचा हा जस्बा सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरलाय. अनेक जण सिराजच्या लढवय्या वृत्तीला सलाम करत आहेत. मोहम्मद सिराज न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्या नावाला साजेशी गोलंदाजी करु शकला नाही. आपल्या 4 षटकांच्या कोट्यात त्याने 39 धावा खर्च केल्या. मात्र त्याने दुखापतीनंतरही ओव्हर टाकून सर्वांची मन जिंकली.

हेही वाचा: WBBL : स्मृतीचं शतक विक्रमी ठरलं, पण… (VIDEO)

न्यूझीलंडच्या डावातील अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मिशेल सँटनरने मारलेला जोरदार फटका अडवताना मोहम्मद सिराज जखमी झाला. सिराजच्या हातावर चेंडू लागल्यानंतर तो वेदनेनं व्याकूळ झाल्याचे दिसले. मेडिकल टीम मैदानात आली. सिराजच्या हातातून रक्त येतानाही दिसत होते. पण प्रथमोपचार करुन तो पुन्हा गोलंदाजी करण्यास तयार झाला. त्यानंतर त्याने रचिन रविंद्रच्या रुपात एक विकेटही आपल्या खात्यात जमा केली.

हेही वाचा: IND vs NZ : रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी

विराट कोहलीने टी-20 संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधारपदाचे ओझे देण्यात आले आहे. रोहितने यापूर्वी काही सामन्यात संघाचे नेतृत्व केले असले तरी आता तो पूर्णवेळ कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने विजयी सुरुवात केली आहे. दुसरीकडे केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत साउदी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व करत होता.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here