आता फकस्त पक्ष वाढवायचा हाय..!

आता फकस्त पक्ष वाढवायचा हाय..!

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

महापौरसायब… हे सगळे तुमचे इरोदक… तुमी तर सायबांचे निष्ठावंत यांना सोबत घेऊन कसं काम करणार ओ? या पडलेल्या गुगलीवर मनोहरपंतांनी अगदी सहज उत्तर दिलं… काय करावं पक्षवाढीची सद्या अशाच लोकांची गरज हाय.. यांना सोबत घेऊन काम करावं लागणार हाय… आता इलाजच नाय हो… पंतांच्या या वाक्‍यावर हास्याचे फवारे उडले…

हेही वाचा: तुम्हाला OK या शब्दाचा अर्थ किंवा फुलफॉर्म माहिती आहे का?

निमित्त हुतं… कुमठा नाका परिसरात राष्ट्रवादीच्या इद्याताईच्या गॅस एजन्सीचं उद्‌घाटनाचं… सोलापुरातील सात माजी महापौर एकाच वक्ताला उपस्थित हुते… इतकंच काय पण एकमेकांबद्दल नेहमीच आकस असलेल्या या राजकीय नेत्यांनी एकाच टेबलावर बसून (शाकाहारी) जेवणावर ताव मारला… गप्पांचा फड रंगू लागला हुता… इतका सगळा झगमगाट बगितल्यावर ताईला ईदान परिषदेचं तिकीट नक्कीच असेल असं वाटू लागलं…

तवा गप्पा मारता-मारता महेशअण्णा म्हटलं, मी शरीरानं सेनेत हाय… पन मनानं राष्ट्रवादीत! सगळ्यांनाच हे ठाव हुतं… यावेळी संतोषभाऊ, वडाळ्याचं काका, भारतकाका, दिलीपभाऊ, परमोददादा, नलिनीताई, इरोदी पक्षनेता अमोलबापू, मोठ्या सायबांना भेटलेलं वकीलसायब, राष्ट्रवादीत गेलेलं शिंदेसायबांचं निष्ठावंत सुधीरभाऊ असं सगळे एकत्र बसले हुते… एकानं सुधीरभाऊची खेचायची म्हनूनशान ‘कोण खरटमल?” असं ताई अन्‌ सायब म्हन्त्यात असं पेपरात वाचलंय बगा.. असं म्हटल्यावर आपण त्येस्नी उत्तर देणार नाय… मग ते मोठे हुतील की? असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला… ते तर पत्रकारांनीच इचारायला हवं असंबी पालुपद जोडलं… असं गप्पांचं रान पेटलं असताना मोकळ्या मनाच्या जनार्दनअण्णाला राहवलं नाय, त्येंनी संतोषभाऊकडं हात करत ते आपलं सपाटेसायब कुठं हाय? असं सहजच इचारलं… तवा दिलीपभाऊ, महेशअण्णांनी कान टवकारलं… संतोषभाऊनं लगेच मोबाईल उचलला पन नेहमीच्या स्टाईलनं तो लावला काय नाय! तोपतूर तर दत्त म्हनून मनोहरपंत हजर! पंतांना पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. इळ्या-भोपळ्याचं सख्य असलेले सगळे एकत्र कसं असं पाहणाऱ्याला वाटू लागलं हुतं… एकानं तसं इचारलंबी तवा पंत म्हनलं… मोठ्या सायबांनी सांगितल्यापरमाणं आता पक्ष वाढवायचं हाय… कोणाबरुबरबी आपण तडजोड करतुया… पक्षवाढ गरजेची हाय… पक्षासाठी काय बी!

हेही वाचा: 2 ते 17 वर्षांच्या मुलांना COVAXIN चा डोस! जानेवारीपासून लसीकरण

तिथल्याच एकानं मधीच पंतांना भाऊ (कोणता ते स्पष्ट न करता) फोन करत हुते असं सांगितलं… तवा म्या पवारांचा निष्ठावंत हाय… पवारांबद्दल कायबी वंगाळ बोलत नाय असं पंत म्हटलं… त्यावर भाऊबी लईच बिलंदर, त्ये म्हटलं, मग ते आमच्या योगेशभाऊला का शिव्या घालताव… तो पतूर सगळेजण गॅस एजन्सीचं कार्यालय बगायला विद्याताईबरुबर गेले… पंत लई हुशार… बाकी नेत्यांनी काहीही भेटवस्तू आणली नव्हती, पन पंतांनी ताईला रंगीबिरंगी आकाशदिवा भेट दिला… तवा गेटमदनं आपलं बीजेपीचं सुरेशअण्णा आलं… एका दोस्तानं तिल्या दिलीपभाऊकडं हात करत यांनाबी सांगा हे बी पान खात्यात… पानामुळं तुम्हाला काय झाल्तं यांना माहितीय… भाऊ म्हटलं, माझं ठरलेलं दुकान अन्‌ पानवाला हाय… मला तसलं काय बी हुनार नाय!

– थोरले आबासाहेब



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here