
Kia ची नवी कार, नवीन वर्षात होणार भारतात लाँच
5 तासांपूर्वी
नवी दिल्ली : किया इंडिया (Kia India) ही वाहन उत्पादक कंपनी पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एक बहुद्देशील वाहन (एमपीव्ही) (MPV) सादर करणार आहे. याबरोबर कंपनी भारतीय बाजारात आपले उत्पादन पोर्टफोलिओचे विस्तार करण्याची तयारी करत आहे. कंपनीच्या एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. किया इंडिया देशातील बाजारात सध्या सेल्टाॅस, साॅनेट आणि काॅर्निव्हल या तीन वाहनांची विक्री करित आहे. कंपनी जागतिकस्तरावर १६ डिसेंबर रोजी चौथी कार लाँच करणार आहे. दुसरीकडे ही कार भारतात पुढील वर्षी जानेवारी-मार्च दरम्यान सादर करणार आहे. किया इंडियाचे प्रबंध निर्देशक तथा मुख्य कार्यपालन अधिकारी ताए जिन पार्क येथे आयोजित एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, की भारत जागतिकस्तरावर कियासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. हे केवळ विक्रीसाठी नव्हे. भारतात उत्पादन, जागतिक संशोधन आणि विकास केंद्र बनण्याचीही क्षमता आहे. ते म्हणाले, की कंपनीला देशात सेल्टाॅस, साॅनेट आणि काॅर्निव्हल या वाहनांसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा: Boom Motors ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फिचर्स
आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे, की किया इंडिया २०२२ मधील पहिल्या तिमाहीत आपले नवीन उत्पादन सादर करणार आहे. पार्क म्हणाले, नवीन कारमध्ये मोठ्या कुटुंबाला इतर एसयूव्हीच्या तुलनेत जास्त जागा असेल. कियाच्या नवीन कारचे कोडनेम सध्या केवायई असे सांगितले जात आहे. ती मल्टी पर्पज व्हेईकल असून शकते असा अंदाज बांधला जात आहे. त्याने कंपनीच्या व्यवसायाला गती मिळेल. किया भारतीय कार ग्राहकांचा विचार करुन मोठ्या वाहनावर मोठा दावा करीत आहे. नवीन सेगमेंट खुले करण्याच्या विरोधात ती नाही.
Esakal