
5 तासांपूर्वी
अकोला : विद्युत शाखेतील पदवी आणि पदविकाधारक सुशिक्षित बेरोजगार अभीयंत्यांना लॉटरी पध्दतीने कामाचे वितरण करण्यात आले.
रतनलाल प्लाँट येथील मंडळ कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात उपस्थित १८ विद्युत शाखेतील सुशिक्षित बेरोजगार अभीयंत्यांना ७८लाख ४४हजार रूपयांची १८ कामे लॉटरी पध्दतीने वाटून देण्यात आली.
हेही वाचा: शेती पाहिजे, पण मुलगा शेतकरी नको !
अकोला मंडळ कार्यालयाचे अधिक्षक अभीयंता पवनकुमार कछोट यांनी उपस्थित अभीयंत्यांना बोलावून चिठ्ठी व्दारे कामाचे वाटप केले. यावेळी कार्यकारी अभियंता जी.के.पानपाटील, उपकार्यकारी अभीयंता एच.आर.बेलूरवार उपस्थित होते. महावितरणने सन २०१५ पासून विद्युत शाखेतील सुशिक्षित बेरोजगार अभीयंत्यांना कामे देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत ८३ अभीयंत्यांना १०कोटी ४९ लाख रुपयांचे कामे देण्यात आली आहे.
Esakal