
5 तासांपूर्वी
मुंबई: आयपीओच्या माध्यमातून Paytm ने आज शेअर बाजाराच पदार्पण केलं. यावेळी पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा भावूक झाले होते. पेटीएम ही भारतातील पहिल्या पिढीची स्टार्टअप कंपनी आहे. १० हजार रुपये वेतनापासून सुरु झालेला विजय शेखर शर्मा यांचा उद्योजक बनण्यापर्यंतचा प्रवास खरोखरच खूपच कौतुकास्पद आहे. भावी पिढीला प्रेरणा देणारा आहे.
वयाच्या २७ व्या वर्षी विजय शेखर शर्मा हे महिन्याला १० हजार रुपये वेतन घेत होते. त्यावेळी वेतनाचा हा आकडा विवाहाच्या बोहल्यावर चढण्यासाठी पुरेसा नव्हता. “२००४-०५ साली मला माझ्या वडिलांनी कंपनी बंद करुन महिन्याला ३० हजारापर्यंत वेतन मिळणार असेल, ती नोकरी करायला सांगितली” असे विजय शेखर शर्मा यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले.
आज Paytm भारतातील डिजिटल पेमेंटमधील लोकप्रिय कंपनी आहे. याच पेटीएमची शर्मा यांनी २०१० साली स्थापना केली होती. इंजिनिअरगची पदवी घेतलेल्या विजय शेखर शर्मा यांची पेटीएम कंपनी सुरुवातीला मोबाइल रिचार्जचे काम करायची. (सविस्तर वृत्त लवकरच)
Esakal