Pune : सीएनजी पुन्हा दोन रुपयांनी महागला
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पेट्रोलच्या वाढत्या किमतीला कंटाळून सीएनजीचा पर्याय स्वीकारलेल्या आणि आधीपासून सीएनजीचा वापर करीत असलेल्या अनेक वाहनधारकांना आता आणखी एक आर्थिक झटका बसला आहे. आजपासून सीएनजी एक रुपये 80 पैशांनी महागले आहे. त्यामुळे आता शहरात एक किलो सीएनजीसाठी 63.90 रुपये मोजावे लागणार आहे.

हेही वाचा: ST Strike : सरकारची विरोधकांशी चर्चा; तोडग्याची शक्यता!

गेल्या महिन्यात दोनदा दरवाढ होऊन सीएनजी प्रतिकिलो ४.०६ रुपयांनी महागले होते. चार आणि १४ आॅक्टोंबर रोजी अनुक्रमे दोन आणि २.६ रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. एकदाच महिन्यात दोन वेळा चार रुपयांनी दरवाढ झाल्याची ही पहिलीच घटना आहे. त्यानंतर आज सीएनजी 1.80 रुपयांनी महागले. मार्च 2020 पूर्वी तीन ते चार महिन्यांतून एकदा सीएनजीच्या दरात वाढ होत. ही वाढ जास्तीत जास्त एक रुपयांपर्यंत असायची. मात्र आता दर महिन्याला दरवाढ होत असून ती दोन रुपयांच्या पुढे देखील जात असल्याचे यातून स्पष्ट होते.

दिवाळीत पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. हा दिलास अद्याप कायम असून त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र आता सीएनजीचा भडका होत असल्याचे दिसते.

हेही वाचा: ‘इफ्फी’मध्ये यंदा ‘OTT’वरील चित्रपटांचाही समावेश; अनुराग ठाकूर यांची घोषणा

सीएनजीचे वाढलेले दर

तारीख – वाढलेलेली किंमत – दर (प्रतिकिलो)

 • १ जुलै २०२० – १ रुपये – ५४.८०

 • १० आॅक्टोंबर -२०२०- ९५ पैसे (दर कमी झाला)- ५३.८५

 • ०४ जानेवारी – १.६५ रुपये – ५५.५०

 • 4 जून – रु 1.50 – 56.60

 • 2 ऑगस्ट – 90 पैसे – 57.50

 • ४ आॅक्टोंबर – दोन रुपये – ५९.५०

 • १३ ऑक्टोबर – २.६० रुपये ६२.१०

 • १८ नोव्हेंबर – १.८० रुपये ६३.९०

18 नोव्हेंबरचे दर :

 • पेट्रोल – 109.50

 • पॉवर पेट्रोल – 113.50

 • डिझेल – 92.50

 • CNG – 63.90 (किलो)Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here