एसटी बस

पिंपरी : एसटीचे आणखी पाच कर्मचारी निलंबित…

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी – मागील आठवड्यात सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या आणखी पाच एसटी कर्मचाऱ्यांना बुधवारी (ता.१७) निलंबित करण्यात आले आहे. वल्लभनगर आगारातील एकूण ११ कर्मचाऱ्यांवर आत्तापर्यंत निलंबनाची कारवाई झाली आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांना २४ तासात कामावर हजर राहण्याचे आदेश सर्वांना व्हॉट्सॲपवर पाठविण्यात आले आहेत. परंतु, कारवाईला न घाबरता एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे.

एसटी महामंडळाचे शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन पुकारले आहे. वल्लभनगर आगाराबाहेर अनेक कर्मचारी नियमितपणे घोषणा देत आपल्या मागण्या मांडत आहेत. कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे या मागणीसाठी परिवहन खात्याने कारवाईचे हत्यार उपसले आहे. गेल्या ८ तारखेपासून एसटी सेवा ठप्प आहे. लाखों रुपयांचे नुकसान यामध्ये होत आहे. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कर्मचाऱ्यांनी अद्यापपर्यंत निलंबनाच्या कारवाईचा विचार न करता आंदोलन सुरु ठेवले आहे. कोणीही कामावर रुजू झालेले नाही. त्यामुळे, एसटीतील आणखी कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाईचा धडाका सुरुच राहण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा: महापालिकेच्या पाच विषय समितीवर अध्यक्षांची बिनविरोध निवड

एका महिला कर्मचारीला रात्री साडेअकरा वाजता निलंबन कारवाईचा आदेश पाठविल्याने संपातील सर्व कर्मचारी भडकले होते. ट्रॅफिक कंट्रोलरने हा आदेश पाठवला होता. आगार प्रशासनाने पाठविला नव्हता. इतरांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. परंतू, महिलेवर निलंबनाची कारवाई सूडबुद्धीने केल्यामुळे आगारात तणावाचे वातावरण काहीकाळ निर्माण झाले होते.

लालपरी प्रेमींचे परिवहन मंत्र्यांना साकडे

अनेक खेडोपाड्यातील ग्रामपंचायतींनी एसटी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. सहानुभूतीपर पत्रे पाठविली. अनेक सरपंचानी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच, एसटीशिवाय तरणोपाय नसलेल्या अनेक ग्रामस्थांनी आगारात येऊन पाठिंबा दर्शविला. तसेच अनेक संघटना व टुर्स ॲंड ट्रॅव्हल्स असोसिएशननेही एसटीला जीवदान देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. रिक्षा संघटनेनेही प्रश्न न सुटल्यास आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. एमएसईबी, पीएमपीएल या कर्मचारी संघटनांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच बालदिनादिवशी कर्मचाऱ्यांच्या चिमुकल्यांनी संपात सहभागी होऊन रोष व्यक्त केला. अनेकांनी आंदोलनकर्त्यांना चहा, पाणी आणि नाष्टा पुरविला.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here