टाटा-कर्करोग-हॉस्पिटल
sakal_logo

द्वारे

तेजस वाघमारे

मुंबई : कर्करोग रुग्ण (cancer patients) आणि नातेवाईकांच्या निवासस्थानाची व्यवस्था करण्यासाठी गृहनिर्माण विभागाने (housing department) भोईवाडा येथील बॉम्बे डाईंग मिलच्या जमिनीवर (Bombay dyeing mill land) उभारलेल्या संक्रमण शिबिरातील 100 घरे (hundred houses) देण्याचा निर्णय घेतला आहे. या संक्रमण शिबिराला अखेर भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असल्याने टाटा रुग्णालयाला (tata hospital) घरे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार म्हाडाने (mhada) रुग्णालयाला घरे ताब्यात घेण्यासाठी करार करण्याचे पत्र पाठवले आहे.

हेही वाचा: राज्य सरकार विरोधात भाजपचा डोंबिवलीत जनआक्रोश मोर्चा

कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने 100 घरे गृहनिर्माण विभागाने टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. करी रोड येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समूह पुनर्विकास योजनेमधून म्हाडाचा विभागीय घटक असणाऱ्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळास एकू्ण 188 सदनिका प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 300 चौरस फुट असलेल्या 100 सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्याप्रमाणे सरकारने म्हाडाच्या 100 सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयाला हस्तांतरीत केल्या. खासदार शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रुग्णालयाला सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या.

हा कार्यक्रम पार पडताच स्थानिक रहिवाशांनी या निर्यायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. रहिवाशांनी खासदार अरविंद सावंत आणि आमदार अजय चौधरी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही घरे देण्याचा निर्णय रद्द केला होता. त्यानंतर गृहनिर्माण विभागाने म्हाडाने भोईवाड्यात बांधलेल्या संक्रमण शिबिरातील घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र या संक्रमण शिबिराला भोगवटा प्रमाणपत्र मिळाले नसल्याने म्हाडाने टाटा रुग्णालयाच्या ताब्यात घरे दिली नव्हते. अखेर या संक्रमण शिबिराला ओसी मिळाली असून त्यानंतर म्हाडाने टाटा रुग्णालय प्रशासनाला घरे ताब्यात घेण्यासाठी करार करण्याकरिता पत्र व्यवहार केला आहे. रुग्णालयाकडून प्रतिसाद मिळताच घरे ताब्यात देण्यात येतील, असे म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here