
5 तासांपूर्वी
मुंबई : मुंबईत 9 वर्षाखालील 13,948 मुलांना कोविडची बाधा झाली. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुलांना बाधा होऊ नये यासाठी लहान मुलांच्या लसीकरण चाचण्यांचा वेग वाढवण्यात आला आहे. मात्र चाचण्यांना पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. कोविड काळात आतापर्यंत 19 वर्षा खालील 49,743 मुलं कोरोना संसर्गाने बाधित झाली. पाहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या बाधित होण्याचे प्रमाण अधिक दिसले. एकूण बाधित मुलांपैकी 13,947 मुलं 9 वर्षाच्या आतील तर 35,806 मुलं 10 ते 19 वयोगटातील होते.
मुंबई महानगरपलिकेने जून महिन्यात नागरिकांच्या शरीरात विकसित झालेली प्रतिपिंडे जाणून घेण्यासाठी सेरो सर्व्हे करण्यात आला. त्यात एकूण 2,176 लहान मुलांची तपासण्यात आली. या सेरो सर्वेक्षणात 51.18 टक्के मुले कोविड च्या संपर्कात आल्याचे आढळले. त्यापैकी बहुतेक लक्षणे नसलेली मुलं आहेत.
लहान मुलांच्या लसीकरणावर जोर देण्यात येणार आहे.महानगरपालिकेने त्यासाठी तयारी देखील सुरू केली आज.लहान मुलांच्या लसीकरणाची जेथे चाचण्या सुरू आहेत त्यापैकी एक असणाऱ्या नायर रुग्णालयात देखील या चाचण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 12 ते 19 वयोगटातील 20 मुलांवर क्लीनिकल चाचण्या सुरू झाल्या असून आणखी मुलांची नोंदणी करण्यात येत आहे.त्याशिवाय आता 2 ते 12 वयोगटातील मुलांच्या चाचण्या देखील सुरु करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा: HSC EXAM : ‘या’ तारखेपासून अर्ज नोंदणी; जाणून घ्या सविस्तर माहिती
लहान मुलांची नोंदणी सुरू आहे. दिवाळीतील सुट्ट्यांमुळे नोंदणीला प्रतिसाद कमी मिळाला. पालकांमध्ये जनजागृती करण्यात येत असून प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा आहे.
Esakal