
5 तासांपूर्वी
दिल्ली : दिल्लीमधील वाढलेले हवेचे प्रदुषण हा देशात चर्चेचा विषया बनला आहे, दरम्यान पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी या हंगामात शेतातील तण जाळत असल्यामुळे दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे. देशभरात या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. हरियाणातील शेतकऱ्याने मुळ प्रश्नावर घाव घालत शेततील तण जाळून टाकण्याच्या पध्दतीलाच फाटा दिला आहे.
पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये शेतकरी शेतात अतिरिक्त ठरलेलं तण जाळून टाकतात मात्यार याचा परिणाम हवेची गुणवत्ता खराब होते आणि प्रदुषणाची पातळी देखील वाढते. दरम्यान हरियाणातील कैथलमधील एका शेतकऱ्याने शेतात उरलेल्या या तणाचे मॅनेजमेंट करणे सुरु केले आणि या समस्येला उत्पन्नाचे साधन बनवले. या शेतकऱ्याने सांगितले की, त्यांनी या तब्बल 300 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देत शेतातील या तणाचे व्यवस्थापन करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवस्थापन व्यवसायात काम करताना भात शेतीच्या यंदाच्या हंगामात त्याने तब्बल 50 लाख रुपयांची कमाई देखील केली आहे.
हेही वाचा: “शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही”
शेतकरी असलेल्या रामकुमार यांनी सांगीतले की, “मी बेलर्सच्या मदतीने भाताचे उरलेल्या तणसाचे बंडल्स बनवतो आणि त्यानंतर ते पेपर बनवणाऱ्या मिल्सना विकतो”. दरम्यान या व्यवसायामुळे प्रदुषण नियंत्रणात तर राहतेच सोबतच शेतकऱ्यांना पैसे देखील मिळत आहेत.
हेही वाचा: गुगलने बॅन केले ‘हे’ 7 Android अॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट
Esakal