
१९ नोव्हेंबर २०२१
पुणे : भारतीय सांस्कृतिक मंडळ आणि राम कोल्हटकर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २७ नोव्हेंबरला पुण्यात दिग्विजय वैद्य यांच्या गायनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी वैद्य हे खट रागातील बंदिशीची मैफल सादर करणार आहेत. खट हा कमी प्रमाणात गायला जाणारा राग आहे.
हेही वाचा: “मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात”; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट
हा कार्यक्रम २७ नोव्हेंबरला सायंकाळी साडेपाच वाजता सहकार सदन, भारती निवास सोसायटी, प्रभात रोड, गल्ली क्रमांक १४ येथे होणार आहे. यापूर्वी भैरव, तोडी, कल्याण, गौड मल्हार अशा काही परिचित राग प्रकारांच्या मैफली झालेल्या आहेत. या खट रागातील बंदिशीच्या कार्यक्रमामध्ये संवादिनीवर संजय गोगटे, तबल्यावर मिलिंद पोटे व व्हायोलिनवर रवी शिधये असणार आहेत.
Esakal