
१८ नोव्हेंबर २०२१
पुणे : पुणे जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांत बुधवारच्या तुलनेत ९६ रुग्णांनी वाढ झाली आहे. यामुळे एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २ हजार १९५ वर गेली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ६१ ने वाढ झाली होती. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा २ हजार ९९ इतकी होती. त्यात आणखी वाढ झाली आहे. मंगळवारी हीच संख्या २ हजार ३८ इतकी होती. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा: हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवरुन गोंधळ! उपसचिवांचं पत्रक व्हायरल
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १५२ जण कोरोनामुक्त झाले असून याउलट दिवसभरात २५३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात ५रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी दोन आणि पिंपरी चिंचवडमधील एका मृत्यूचा समावेश आहे. दिवसभरात नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्राच्या हद्दीत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
हेही वाचा: “मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात”; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट
दिवसभरात आढळून आलेल्या एकूण कोरोना रुग्णांत पुणे शहरातील सर्वाधिक ९२ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ५६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८४, नगरपालिका हद्दीत १८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात तीन नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील ४७, पिंपरी चिंचवडमधील ४४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४४, नगरपालिका हद्दीतील १५ आणि आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दोन जणांचा समावेश आहे.
Esakal