नोकरी बातम्या

‘डीवाय’च्या विद्यार्थ्यांना २२ लाखांपर्यंतचे पॅकेज

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी – आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलातील ‘कॉर्पोरेट रिलेशन्स व प्लेसमेंट विभाग’ कार्यरत आहे. या माध्यमातून अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये सहा ते बावीस लाखांपर्यंतच्या वार्षिक वेतनाची नोकऱ्या मिळू लागल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२साठी प्लेसमेंट प्रक्रिया सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग, फार्मसी, एम.बी.ए, एम.सी.ए, अप्लाईड आर्टस अँड क्राफ्ट्स आणि पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मुलाखत होऊन बायजूस, व्होडाफोन, आयडिया,व्हर्चुसा, व्हेरिटास, व्हॅल्यूलॅब्स , राजा सॉफ्टवेअर, जोश सॉफ्टवेअर, ऐकोलाइट, बिर्लासॉफ्ट, दीपक फर्टीलायझर, इवोसिस, डेल्टा एक्स अशा विविध नामांकित कंपन्यांमध्ये मुलांची निवड होत आहे.

हेही वाचा: सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या परीक्षा ऑफलाईनच

या संकुलातील श्रेयस पाटील या विद्यार्थ्याचे ‘‘Youngest Android Google Dev. Expert in India’’ अशी गूगल तर्फे निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटमध्ये वाढ करण्यासाठी Virtual Internship देण्यात आली.

आरपीजी फाउंडेशन आणि झेन्सार यांच्यामार्फत उद्यमशीलता कौशल्य विकासाच्या पुढाकाराने तृतीय वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सध्याच्या नोकरी व व्यवसाय निकषांनुसार प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या उपक्रम विषयक प्रदर्शनासाठी कॅम्पसमध्ये ४०० पेक्षा जास्त सामंजस्य करार नामांकित कंपन्यांबरोबर केले आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष सतेज डी. पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कॅम्पस संचालक डॉ. नीरज व्यवहारे, प्राचार्य डॉ. विजय वधाई आणि डॉ. ए. व्ही. पाटील, प्रा. अरविंद कोंडेकर, डॉ. के. निर्मला, डीन प्लेसमेंट्स जस्मीता कौर यांनी मार्गदर्शन केले.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here