ब्रिटिश ब्रिज

कृष्णा नदीवरील हा जुना पूल १८८४ मध्ये बांधला. ‘आर्य ब्रीज’ या प्रकारात मोडणाऱ्या या पुलाचे बांधकाम दगडी स्वरूपाचे आहे.

sakal_logo

द्वारे

भद्रेश भाटे

वाई (सातारा) : येथील कृष्णा नदीवर (Krishna River) नवीन प्रशस्त पूल बांधण्यासाठी ब्रिटिश (British Bridge) काळात बांधलेला जुना पूल पाडण्याचे काम उद्यापासून (ता. १९) हाती घेण्यात येणार आहे. ऐतिहासिक वैभव असलेला हा पूल नामशेष होणार या विचाराने वाईकर अस्वस्थ झाले असून, त्याबाबत अनेक उलट- सुलट आणि भावुक प्रतिक्रिया समाज माध्यमावर (सोशल मीडिया) उमटत आहेत. जुनी आठवण जपण्यासाठी अनेक जण पुलावर व पुलाखाली उभे राहून सेल्फी काढताना दिसत आहेत. पूल हा ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करावा, अशी मागणी तालुका कॉंग्रेसच्या (Congress) वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहरातील उत्तर- दक्षिण भागाला, किसन वीर चौक ते सोनवीरवाडी यांना जोडणारा कृष्णा नदीवरील हा जुना पूल १८८४ मध्ये बांधला. ‘आर्य ब्रीज’ या प्रकारात मोडणाऱ्या या पुलाचे कमानीचे बांधकाम दगडी स्वरूपाचे आहे. एका ब्रिटिश कंपनीने हा पूल बांधला. पूल उभारताना त्याचे जीवनमान १०० वर्षे गृहीत धरण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर हा पूल कालबाह्य झाल्याचे संबंधित ब्रिटिश शासनाने व कंपनीने १९८४ मध्ये पालिकेला कळविले होते. त्यानंतरही अनेक वर्षे हा पूल सुस्थितीत राहील, अशी त्याची रचना आहे. या पुलाने नदीला आलेल्या महापुराला झेलत वाईकरांना साथ दिली. हा पूल शहरातील अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक घटनांचा साक्षीदार आहे. दिवसेंदिवस शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक लक्षात घेता. नवीन पर्यायी पुलाची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती.

हेही वाचा: महानायक अमिताभच्या ‘कौन बनेगा करोडपती’त ‘भोंदूगिरी’

मात्र, त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने, तसेच जुना पूल वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा आणि धोकादायक असल्याने पालिका प्रशासनाने याच ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविला होता. आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून या प्रस्तावास शासनाने मान्यता देऊन १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान जुना कृष्णा पूल हा ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करावा, अशी सामान्य जनतेची इच्छा आहे. त्यामुळे पुलाची जागा सोडून इतर पर्यायी जागेवर नवीन पूल बांधावा, अशी मागणी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र भिलारे व युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा: BJP आमदाराच्या ‘या’ विधानामुळे NCP आमदाराचा विजयाचा मार्ग मोकळा?Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here