
5 तासांपूर्वी
अकोला : जात पळताळणी करण्याकरिता या कार्यालयात कंत्राटी पध्दतीने काही कर्मचारी समुहाची नियुक्ती केलेली आहे. या कार्यालयात येणाऱ्या लोकांना कंत्राटी कर्मचारी यांचे कडून जातपळताळणी करिता लागणारे कागदपत्रांची यादी दाखविली जाते. हे कागदपत्र पूर्ण करूनच या कार्यालयात जातपळताळणी करण्यासाठी असलेला अर्ज स्वीकारल्या जातो. या अर्जात काही त्रुटी असल्यास परत पाठविले जाते. अर्ज स्वीकारल्या जात नाही. त्यांची दिशाभूल होत आहे, अशी कामाची पध्दत समोर आली आहे.
जातपळताळणीकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रांची यादी बाबत अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असून, जातपळताळणीसाठी अर्जदारांना अकोला जातपळताळणी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. जिल्हाभर रस्त्यांचे कामे सुरू असून काही अर्धवट स्थितीत आहेत. सोबत एसटी कर्मचाऱ्यांचा संपसुध्दा सुरू आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे.
हेही वाचा: शिवशाही बस संप काळात गायब; प्रवाशांची होतेय गैरसोय
या परिस्थीतचा सामना करताना आपल्या पाल्यांचे जातपळताळणीसाठी पालकांना शहरात चकरा माराव्या लागत आहेत. आज उपायुक्त तथा सचिव जिल्हा जात पळताळणी समिती, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांची भेट घेवून प्रदिप गुरुखुद्दे यांनी चर्चा केली असता यातून सोपा आणि सुकर मार्ग काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या कार्यालयात जातपळताळणीसाठी येणाऱ्या लोकांना जिल्हयाच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यातून यावे लागते. जिल्हाभर रस्त्यांचे कामे सुरू आहेत. एसटी सेवा खंडीत झालेली असून, त्यांचे कर्मचारी संपावर गेलेले आहेत. लोकांना अकोला शहरात येण्याकरिता वाहने उपलब्ध नाहीत. रस्त्यांवर अनेक अपघात होत असतात. ग्रामीण भागात शेतीची कामे सुरू आहेत. काहींना दवाखान्याची कामे असतात. अशा विविध प्रकारच्या सर्व जनतेच्या समस्या आहेत आणि आपल्या कार्यालयात या विविध ग्रामीण भागातील लोकांना अनेक वेळा त्रुटी दाखवून परत पाठविले जाते व परत परत बोलाविले जाते. अशा तक्रारी येत आहेत. या बाबत सर्व बाबतीत गुरुखुद्दे यांनी चर्चा करून अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.
Esakal