
5 तासांपूर्वी
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यानंतर देशभरातून वेगवेळ्या प्रतिक्रीया उमटत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निर्णयाचं स्वागत करताना केंद्र सरकारवर टीका देखील केली आहे. संजय राऊत यांनी यावेळी केंद्र सरकारने हे आधीच आंदोलन मागे घेतले असते तर शेतकऱ्यांचे मृत्यू झाले नसते असं सांगितलं आहे.
हेही वाचा: आमच्या तपस्येत उणीव, कोणाला दोष देण्यात अर्थ नाही – PM मोदी
भाजप नेते प्रविण दरेकर यांनी यावेळी संजय राऊतांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील एसटी कर्मचारी सुद्धा आंदोलन करताय, तो कर्मचारी न्याय मागतोय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणे हे कामगारांचं आंदोलन होऊ नये असं वाटत असेल तर त्यांचा प्रश्नावर सुद्धा तोडगा काढा असं ते म्हणाले आहे.
Esakal