अपघात
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा


कळंबू :
शहादा येथील चंद्रकांत माणिकराव महाले यांचे लहान चिरंजीव शुभम महाले यांचे पुणे येथे अपघाती (Accident) निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक करण्यात येत आहे.

हेही वाचा: जळगाव : वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

सारंगखेडा ता. शहादा येथील चंद्रकांत माणिकराव महाले ह. मु. ( शहादा ) गणेश नगरातील रहिवासी चंद्रकांत महाले यांचे चिरंजीव शुभम महाले हे नोकरीनिमित्त पुणे येथे होते. नेहमीप्रमाणे ता. १७ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या दरम्यान मित्रासोबत दुचाकीने कामावरून घरी येत असतांना मंचर ( पुणे) रस्त्यावर कंटेनेरने धडक दिल्याने शुभम महाले यांना गंभीर दुखापत होऊन जागीच गतप्राण झाले तर सोबत असलेले मित्र प्रेमसिंग गिरासे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे कळते, मयत शुभम महाले यांनी बी. एस. सी. ऍग्री चे शिक्षण लोणखेडा ता.शहादा) येथे पूर्ण करून पुणे ( मंचर) येथील बिग बास्केट कंपनीत नोकरीला होता.

हेही वाचा: जळगाव : चोपडा पं. स. सभापतिपदी कल्पना पाटील

शुभम ची ओळख नातेवाईक व शाळेत अतिशय शांत व मनमिळाऊ स्वभाव म्हणून होती. शुभम मयत झाल्याची वार्ता गाव परिसरात वाऱ्यासारखी पसरातच कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवारामध्ये आक्रोश झाला. गुरुवारी पुणे येथून मयत शुभमचे पार्थिव रूग्णवाहिकेने शहादा येथील गणेश नगरातील निवासस्थानी आणून तेथून शहादा येथील स्मशानभूमीत अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय मन सुन्न करणारी घटना घडल्याने उपस्थितीताचे डोळे पाणावले. शुभमच्या पच्यात आई, वडील मोठा भाऊ, काका असा परिवार आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here