
Winter Care: सर्दी खोकला झाल्यामुळे वैतागले आहात? हे सहा उपाय करा
5 तासांपूर्वी
वातावरणात बदल झाला की अनेकांना सर्दी खोकला होतो. हिवाळ्यात वातावरण गार असते. त्यामुळे काही लोकांना हा त्रास व्हायला सुरू होतो. काहीवेळा हा त्रास खूप होतो. अशावेळी काही घरगुती उपाय करून सर्दी, खोकला नियंत्रणात आणावा लागतो. मात्र काही जण डॉक्टरांकडे जाणे पसंत करतात. पण त्रास मुळापासून काढून टाकायचा असेल तर काही घरगुती उपाय करणे गरजेचे आहे.
हेही वाचा: वजन कमी करण्यासाठी किती कॅलरीज बर्न करायच्यात? जाणून घ्या

हिवाळी आरोग्य टिप्स
1) गुळण्या करा- कोमट पाण्यात एक चमचा मीठ घाला. ते घालून दिवसातून 3 ते 4 वेळा गुळण्या करा. असं केल्याने सर्दी, खोकला आणि घसादुखीपासून आराम मिळेल. तसेच घशातली सूज कमी होण्यासही मदत होईल.
2) भरपूर लसूण खा- हिवाळ्यात लसूण खाणे चांगले मानले जाते. जर दररोज कच्ची लसूण खाणार असाल तर सर्दीपासून लवकर बचाव होईल. लसूण भाजून घेऊन खाणेही चांगले राहील.
3) मीठ मिसळलेल्या पाणी नाकात टाका- एका कप पाणी घेऊन त्यात मीठ मिसळा. चांगले मिक्स करा. मग एका ड्रॉपरच्या मदतीने त्या पाण्याचे दोन थेंब नाकात टाका. दिवसातून 2 ते 3 वेळा असे केल्यास म्युकस ड्रेन होण्यास मदत होते.
4) सूप प्या- सूप प्यायल्याने घशाला आराम मिळतो. त्यामुळे या काळात सूप पिणे अतिशय चांगले. जर चिकन सूप पिणार असाल तर घशातल्या वेदना, सूज कमी होईल. तसेच प्रतिकारशक्ती वाढेल.
5) आल्याचा चहा प्या- चहा प्यायल्याने तरतरी येते. मात्र थंडीच्या दिवसात भरपूर आलं घालून चहा प्यायलात तर थंडीमुळे झालेला कफ कोरडा होईल. तसेच तो शरीरातून बाहेर पडण्यास मदत होईल.
6) हळदीचे दूध – हळद आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. कोमट दुधात हळद मिसळून पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात हळद मिसळून प्या. सर्दी आणि खोकल्यापासून लवकर आराम मिळेल.
हेही वाचा: Garlic Milk प्यायलात का? हे आहेत 10 फायदे
Esakal