बीएमसी
sakal_logo

द्वारे

समीर सुर्वे

मुंबई : घाटकोपर-मानखुर्द (Ghatkopar-Mankhurd) जोड रस्त्यावरील नव्या उड्डाणपुलाला (new flyover) छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव (chhatrapati shivaji maharaj) देण्याचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित (proposal on waiting) आहे. भाजपकडून (bjp) सातत्याने नामकरणाची मागणी (naming demand) लावून धरली जात आहे; तर पुलाचे काम पूर्ण न झाल्याने नामकरण योग्य नसल्याचे कारण प्रशासन (mva government) देत आहे. त्यामुळे या महिन्यात होणाऱ्या महासभेच्या कामकाजात पुन्हा भाजप शिवसेनेला (shivsena) घेरण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे

हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलिसांवर हल्ला; झारखंडमध्ये आरोपीला ठोकल्या बेड्या

घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यावरील हा उड्डाण पूल १ सप्टेंबर रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, पण पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने नामकरण करणे योग्य नाही, अशी भूमिका जून महिन्यात प्रशासनाने घेतली होती. प्रशासनाची ही भूमिका अद्याप बदललेली नाही. या महिन्याच्या कामकाजात प्रशासनाकडून पुलाच्या नामकरणांच्या प्रस्तावावर पुन्हा एकदा अहवाल सादर केला आहे. त्यात नामकरण न करण्यासाठी जुने कारणच सादर केले आहे. पण भाजप सातत्याने नामकरण करण्याची मागणी करत आहे. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळण्याची शक्‍यता आहे.

काय आहे वाद ?

या पुलासाठी शिवसेना आणि भाजपकडून विविध नावांची शिफारस करण्यात आली होती. दोन्ही पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह इतर काही नावांची शिफारस करण्यात आली होती. अखेरीस छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव या पुलाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नामकरण अद्याप झाले नाही. तसेच, घाटकोपर मानखुर्द जोड रस्त्याचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले असे आहे. मात्र, या नावाचा उल्लेखही या मार्गावर कोठेही नाही. त्यामुळे रस्त्यावर तसा नामफलक असावा, अशी मागणीही भाजपने केली होती.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here