ऑनलाइन फसवणूक
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वृद्ध नागरिकाडील क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती चोरुन सायबर गुन्हेगारांनी वृद्ध नागरीकाच्या बॅंक खात्यातील 21 लाख 11 हजार रुपयांची रक्कम चोरली. हि घटना सोमवारी (ता.16) रात्री दिड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे देशांमध्ये परत आणावेत ; चंद्रकांत पाटील

याप्रकरणी सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या 64 वर्षीय नागरीकाने फिर्क्षाद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची अभियांत्रिकीची कामे करणारी खासगी कंपनी होती. त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली. त्यांच्याकडे क्रेडीट कार्ड आहे, त्यावरुन त्यांनी कोणत्याही प्रकारे व्यवहार केला नव्हता. तरीही सोमवारी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे असलेल्या क्रेडीट कार्डवरुन फिर्यादीच्या बॅंकेतील बचत खात्यातुन 12 लाख रुपये, त्यापाठोपाठ पुन्हा 8 लाख रुपये तसेच मुदत ठेव खात्यातील 80 हजार रुपये असे एकूण 21 लाख 11 हजार रुपये ऑनलाईन माध्यमाद्वारे काढून घेण्यात आले.

हेही वाचा: ‘शेतकरी- मजुरांच्या विरोधात रचलेलं षडयंत्र हरलंय’

फिर्यादीकडील क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती चोरुन सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातुन रक्कम चोरली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली. दरम्यान, कार्ड क्‍लोनिंगद्वारे वृद्ध नागरीकाच्या बॅंक खात्यातील रक्कम चोरल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे करीत आहेत.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here