सायकल

मोहन रानडे यांच्या स्मारकासाठी पुणे ते गोवा सायकल मोहीम

sakal_logo

द्वारे

अक्षता पवार

पुणे – गोव्याला पोर्तुगीजांच्या ताब्यातून स्वतंत्र करण्यासाठी आझाद गोमंतक दलाच्या माध्यमातून मोहन रानडे यांनी गोवामुक्तीसाठी पोर्तुगीज सरकारविरुद्ध लढा सुरू केला. गोव्याला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या मोहन रानडे यांचे स्मारक गोवा येथे व्हावे यासाठी पुणे ते गोवा सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्थेचे अध्यक्ष एम. डी. देशपांडे आणि विश्‍वस्त संदीप पवार यांनी दिली.

या वेळी देशपांडे म्हणाले, ‘‘रानडे यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. पुणे येथे स्थायिक होऊन रानडे यांनी या संस्थेची स्थापना केली व समाजसेवेचे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या योगदानासाठी गोव्यात त्यांचे स्मारक व्हावे याकरिता संस्थेतर्फे गोवा सरकारला निवेदन देण्यात येत आहे.’’ यामध्ये गोवा विधानसभेत रानडे यांचे तैलचित्र लावणे, महिला बाल कल्याण केंद्र, चिंबलचे नूतनीकरण करणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील विशेष काम करणाऱ्यास शिष्यवृत्ती देणे अशा गोष्टींची विनंती निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

हेही वाचा: “कंगणा, गोखले, गुप्तें विरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”

या मोहिमेची सुरुवात मंगळवारी (ता. २३) कर्वेनगर येथील काकडे सिटी येथून सायंकाळी चार वाजता होणार असून, यामध्ये संस्थेचे संदीप पवार आणि पाच विद्यार्थी अशा सहा जणांचा सहभाग असेल. रानडे यांच्या स्मारकासाठी या मोहिमेंतर्गत सायकलस्वार एक लाख नागरिकांच्या सह्यांचे निवेदन घेऊन २६ नोव्हेंबरला गोव्यात पोचतील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना २७ नोव्हेंबरला हे निवेदन देण्यात येणार आहे. मोहिमेच्या उद्‍घाटनासाठी सुमारे ५०० सायकलस्वार कर्वेनगर ते वारजे पुलापर्यंत सायकल रॅलीत भाग घेतील, असे या वेळी पवार यांनी सांगितले.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here