Hyundai Ionic 5 इलेक्ट्रिक SUV
sakal_logo

द्वारे

संघ-इश

इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये Hyundai कंपनी आपली नवीन SUV Ioniq 5 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अद्याप या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या लॉन्च तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु ही EV चेन्नईमध्ये टेस्टिंगदरम्यान रस्त्यावर पाहण्यात आली आहे. रस्त्यावरील Ioniq 5 चे टेस्ट मॉडेल पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की ही इलेक्ट्रिक SUV लवकरच भारतात लॉन्च केली जाऊ शकते. ही इलेक्ट्रिक SUV 301bhp पॉवर आणि एका चार्जवर 481km पर्यंतची धावेल.

Hyundai कडून या इलेक्ट्रिक SUV गोल्बल डेब्यु हा याच वर्षी फेब्रुवारी दरम्यान झाला होता, अग्रेसीव्ह लुक असलेली ही SUV चा फोटो पाहून ती फ्युचरीस्टीक लूकसह लॉच होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हिडन एलईडी टेललाइटमुळे एसयूव्हीचा मागील लूक खूपच बोल्ड आणि आक्रमक देसेल. कंपनी प्रथमच या SUV मध्ये दर्जेदार एरोडायनॅमिक्ससाठी क्लैमशेल देत ​​आहे, ज्यामुळे पॅनेलमधील अंतर कमी होते. याशिवाय फ्रंट बंपरवर दिलेला व्ही-आकाराचा डीआरएल एसयूव्हीचा लुक आणखी प्रीमियम बनवतो.

हाय-टेक इंटिरियर

कंपनी या इलेक्ट्रिक SUV मध्ये ऑटो फ्लश फिटिंग डोअर हँडल देत आहे. एसयूव्हीमध्ये देण्यात आलेले व्हिल्स 20 इंचांची आहेत. ही व्हिल विशेष पॅरामेट्रिक पिक्सेल डिझाइन तंत्रज्ञानासह येतात. ह्युंदाईने या कारचे केबिनही खूप प्रीमियम केले आहे. युनिव्हर्सल आयलंड सारखे फीचर्स यामध्ये देण्यात आली आहेत. या फीचर्सच्या मदतीने, मध्यवर्ती कन्सोलला 140 मिमीने मागे सरकवले जाऊ शकते. याशिवाय या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रॉनिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: येतेय Jeep ची सर्वात स्वस्त सब-कॉम्पॅक्ट SUV; जाणून घ्या डिटेल्स

185kmph टॉप स्पीड

कंपनीने इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर विकसित केलेली ही SUV दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येईल – 58kWh आणि 72kWh. याशिवाय, दोन इलेक्ट्रिक मोटर लेआउट्सचा पर्याय देखील असेल- फक्त रियर मोटर आणि दुसरी रियर आणि फ्रंट मोटर. एसयूव्हीच्या रियर मोटर प्रकारात इलेक्ट्रिक ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टीम देखील आहे. त्याची एकत्रित पावर 301bhp आणि टॉर्क 605Nm आहे. SUV चा टॉप स्पीड 185kmph असून सिंगल चार्रेंजमध्ये ही कार 481km चालते.

हेही वाचा: Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्चEsakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here