
Video : हिटमॅनसाठी कायपण; चाहत्याने थेट मैदानात शिरुन धरले पाय
5 तासांपूर्वी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी20 सामन्यांची मालिका रंगली आहे. रांचीच्या मैदानातील दुसरा सामना जिंकून रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मालिकाही खिशात घातली. रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवत न्यूझीलंडचा डाव 6 बाद 153 धावांत आटोपला.
न्यूझीलंडच्या डावात एक चाहता थेट मैदानात घुसल्याचे पाहायला मिळाले. सुरक्षा रक्षकांना चकवा देत प्रेक्षकांमधून आलेल्या या चाहत्याने फिल्डिंग करत असलेल्या रोहित शर्माला गाठले. रोहितच्या पाया पडत त्याने रोहित शर्माप्रती आपले प्रेम दाखवून दिले. ज्यावेळी सुरक्षा रक्षक त्याला बाहेर काढण्यासाठी मैदानात पोहचले त्यावेळी तो त्यांना चुकवत पुन्हा प्रेक्षक गॅलरीत गेला. पॅव्हेलियनमध्ये पोहचल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्या धरले.
हेही वाचा: रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका
हेही वाचा: KL राहुल-रोहितनं रचला विक्रम, पाकच्या बाबर-रिझवान जोडीशी बरोबरी
हा व्यक्ती ज्या पॅव्हेलियनमधून मैदानात घुसला होता ते व्हीआयपी स्टँड होते. याठिकाणी सामान्य प्रेक्षकांना बसण्याची परवानगी नसते. त्यामुळे या घटनेमुळे सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
Esakal