काळजी वाढली ! पुणे जिल्ह्यात सक्रीय रुग्ण संख्येत वाढ
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना संसर्गाच्या बाबतीत पुणेकरांची काळजी पुन्हा वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. शहरात गेल्या दहा दिवसात १९९ सक्रिय कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे पुणे शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या साडे आठशेच्या घरात पोचली आहे. पुणेकरांनी घाबरू नये. पण काळजी मात्र पुन्हा पूर्वीप्रमाणे घ्यावी लागणार असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: रोहित-द्रविड पर्वात टीम इंडियाने जिंकली पहिली मालिका

पुण्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या अकरा दिवसांपूर्वी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी ६४७ इतकी कमी झाली होती. तीच संख्या शुक्रवारी (ता.१९) पुन्हा एकदा ८४६ वर गेली आहे. या आकडेवारीवरून फक्त अकरा दिवसात शहरात १९९ सक्रिय कोरोना रुग्ण वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज रात्री शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्ण स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: चित्रा वाघ यांचा पत्ता कट, विधानपरिषदेसाठी बावनकुळेंना संधी!

शुक्रवारी (ता. १९) दिवसभरात पुणे जिल्ह्यात २०० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांत पुणे शहरातील ७५ रुग्ण आहेत. दिवसभरात पिंपरी चिंचवडमध्ये ४५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ६७, नगरपालिका ९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील दोन आणि पिंपरी चिंचवडमधील एका मृत्यूचा समावेश आहे.

दरम्यान, दिवसभरात २२९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ११३ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ३५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७२, नगरपालिका हद्दीतील सात आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दोन जण कोरोनामुक्त झाले आहेत.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here