लाच गुन्हा
sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हक्काच्या घर मिळावं यासाठी केलेला अर्ज मंजूर करुन घेण्यासाठी एक लाख 20 हजारांची लाच (bribe crime) घेणारे एमएमआरडीएच्या (MMRDA) सहाय्यक समाज विकास अधिकारी शहाजी पांडूरंग जोशी (Shahaji joshi) यांच्यासह दोघांना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (Mumbai ACB) अटक केली.

हेही वाचा: मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 2274 दिवसांवर

एमएमआरडीेएनं विलेपार्ले इथं सहार उन्नत मार्ग प्रकल्पासाठी काही झोपड्या तोडल्या, त्याच्यै बदल्यात रहिवाशांना दुसऱ्या ठीकाणी रहायला जागा देण्यात आली. यात तक्रारदाराचीही झोपडी तोडण्यात आली होती, नविन ठिकाणी दिलेल्या जागेचं अलॉटमेंट लेटर हे एमएमआरडीएच्या सामाजिक विकास विभागातून मिळणार होतं. त्यानुसार तक्रारदारानं तसा अर्ज केला होता. सदरचा अर्ज आरोपी शहाजी जोशी यांच्याकडे मंजूरीसाठी पडून होता.

तक्रारदारानं त्यांची भेट घेतली तेव्हा अर्ज मंजूर करण्यासाठी शहाजी जोशी यांनी तक्रारदाराकडे 1 लाख 50 हजाराची मागणी केली, त्यानंतर 1 लाख 20 हजारावर मांडवली करण्यात आली. त्यानंतर तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात येऊन तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरुन सापळा रचण्यात आला. शहाजी जोशी यांनी लाचेची रक्कम त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे द्यायला सांगितलं होतं. सापळा रचून त्या व्यकेतीली अटक करण्यात आली, त्यानंतर त्यानं सांगितलेल्या माहीतीवरुन बाकी आरोपींना अटक करण्यात आली. या सर्वांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम 7, 7 (अ) आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here