हुतात्म्यांची मोदींनी माफी मागावी; केजरीवालांची मागणी

हुतात्म्यांची मोदींनी माफी मागावी; केजरीवालांची मागणी

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर काँग्रेससह विरोधकांनी हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी: शेतकऱ्यांचे अभिनंदन. आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांप्रति संवेदना व्यक्त करते.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल: शेतकऱ्यांच्या लढाईला मिळालेला हा विजय आहे. सातशेहून जास्त शेतकरी या वर्षभराच्या काळात मृत्युमुखी पडले त्यांचीही मोदींनी जाहीर माफी मागावी.

कॅप्टन अमरिंदरसिंग : कायदे मागे घेतल्याबद्दल मोदी सरकारचे अभिनंदन. गुरुनानक जयंतीच्या पवित्र दिनी हे कायदे काळे कायदे मागे घेऊन मोदी सरकारने प्रत्येक नागरिकांच्या भावना जपल्या.

IKI अध्यक्ष बद्रीनारायण चौधरी: कायदे मागे घेण्याची घोषणा ठीक आहे. खरा प्रश्न शेतकऱ्यांचे बाजारात होणारे शोषण रोखणे हा असून हमीभावाबद्दल शेतकऱ्यांना खात्री देणे हेही आवश्यक आहे.

MIAM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी: ”दहन पर हैं उन के गुमाँ कैसे-कैसे, कलाम आते हैं दरमियाँ कैसे-कैसे, ज़मीन-ए-चमन गुल खिलाती है क्या-क्या, बदलता है रंग आसमाँ कैसे-कैसे. भाजपची दुर्बल अवस्था पाहता आगामी निवडणुकांच्या अगोदर हे काळे कायदे मागे घेणे मोदी सरकारला क्रमप्राप्त होते आणि तसेच झाले.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here