सत्तेवर येईपर्यंत विधानसभेत पाऊल टाकणार नाहीः नायडू

सत्तेवर येईपर्यंत विधानसभेत पाऊल टाकणार नाहीः नायडू

sakal_logo

द्वारे

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सत्ताधारी पक्षाकडून आपकडून सतत अपमान होत असल्याचा आरोप करीत तेलुगू देशम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख तसेच विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांनी पुन्हा सत्तेवर येईपर्यंत विधानसभेत पाऊल टाकणार नाही असा निर्धार बोलून दाखविला.

सभागृहात शनिवारी नायडू यांच्या भाषणात सत्ताधारी वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी व्यत्यय आणला. चंद्राबाबू म्हणाले की, गेली अडीच वर्षे मी अपमान सोसत आहे, पण मी शांत राहिलो आहे. आज त्यांनी माझ्या पत्नीला सुद्धा लक्ष्य केले. मी नेहमीच सन्मानाने आणि सन्मानासाठी जगलो आहे. यापुढे मात्र मी अपमान पचवू शकणार नाही. सत्ताधारी सदस्य मला सतत कलंकित करीत आहेत. त्यामुळे मला यातना होत आहेत.

चंद्राबाबू बोलत असतानाच विधानसभेचे अध्यक्ष तम्मीनेनी सीताराम यांनी ध्वनिवर्धक बंद केला. वायएसआर सदस्यांनी चंद्राबाबू हे ढोंग करीत असल्याची टिप्पणी केली.त्याआधी कृषी क्षेत्रावरून सभागृहात थोडी चर्चा झाली. त्यावेळी दोन्ही पक्षांत शाब्दिक खडाजंगी झाली.

चेंबरमध्ये भावविवश

सभागृहातील बैठकीनंतर चंद्राबाबूंनी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक चेंबरमध्ये बोलाविली. त्यावेळी ते भावविवश झाले. त्यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहून सहकारी आमदारांना धक्का बसला. त्यांनी चंद्राबाबू यांना धीर दिला. मग सर्व जण सभागृहात परतले. त्यानंतरच चंद्राबाबूंनी हा संकल्प सोडला.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here