पंतप्रधान मोदी येणार, गॅलरीत कपडे वाळत घालू नका, पोलिसांचा आदेश
sakal_logo

द्वारे

दीनानाथ परब

लखनऊ: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) येणार असल्यामुळे शुक्रवार ते रविवार हे तीन दिवस बाल्कनीत कपडे वाळत घालू नका, असा आदेश काढण्यात आला आहे तसेच या काळात तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील, तर त्याची माहिती पोलिसांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवस उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या (Lucknow) दौऱ्यावर आहेत.

त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी हा विचित्र आदेश काढला आहे. लखनऊ गोमती नगर इथल्या टॉवरमधल्या रहिवाशांनी बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालू नये, असे पोलिसांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. पंतप्रधान मोदी तीन दिवस लखनऊ दौऱ्यावर आहेत. गोमती नगरचे पोलीस प्रमुख प्रशांत कुमार मिश्रा यांनी हा आदेश काढला आहे.

हेही वाचा: आपण सत्याला ओळखणाऱ्या ऋषींचे वंशज आहोत – मोहन भागवत

या आदेशात सरस्वती अपार्टमेन्टचा उल्लखे प्रामुख्याने करण्यात आला आहे. सिगनेचर इमारतीच्या समोर ही बिल्डींग आहे. याच सिगनेचर इमारतीत डीजीपींची अखिल भारतीय परिषद शुक्रवारपासून सुरु झाली आहे. पंतप्रधान मोदी आज शनिवारी आणि रविवार असे दोन दिवस या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. रहिवाशांना शुक्रवारपासून रविवारपर्यंत बाल्कनीत कपडे वाळत घालू नका, असे सांगण्यात आले आहे.



Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here