पश्चिम महाराष्ट्र
sakal_logo

द्वारे

मिलिंद देसाई

बेळगाव : शाळा विलंबाने सुरू झाल्याने कमी दिवसात सर्व अभ्यासक्रम शिकवणे शक्य हॊणार नसल्याने शाळांमध्ये अधिक तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याची सूचना लवकरच शिक्षण खात्याकडून केली जाणार आहे.

शिक्षण मंत्री एन. बी .नागेश यांनी शाळा विलंबाने सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करणे अशक्य असल्याचे मत व्यक्त करीत याबाबत नियोजन करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यानुसार कशाप्रकारे अधिक तास घेण्यात यावेत याबाबतची माहिती लवकरच शाळांना दिली जाणार असून गेल्या वर्षी शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात 30 टक्क्यांची कपात केली होती. परंतु गेल्या वर्षी शाळा फक्त काही दिवसच सुरू होत्या त्यामुळे अभ्यासक्रम शिकवणे कठीण गेले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी लवकर शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या वर्षी अभ्यासक्रमात कपात न करता अधिक तास घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

हेही वाचा: “हा शेतकऱ्यांचा विजय आहे”, मोदींच्या घोषणेवर मलिकांची प्रतिक्रिया

शाळा विलंबाने सुरू झाल्या तरी परीक्षा वेळेत पार पडाव्यात याकडे शिक्षण खात्याचे लक्ष असून मार्च महिन्यापर्यंत सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे तर दहावीची परीक्षा मे महिन्यात पार पडणार असून या परीक्षेचा निकाल जून महिन्यात जाहीर केला जाणार आहे. मात्र परीक्षा पूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना कसरत करावी लागणार असून दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस शाळा सुरू होतात त्यानंतर शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले जाते त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे होते. मात्र सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शाळा सुरू होण्यास विलंब झाल्याने शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता अधिक तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकविल्यास त्याचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होणार आहे.

हेही वाचा: डोंबिवली : शाळा व्यवस्थापक प्राणघातक हल्ल्यातील काही आरोपी मोकाटच

अभ्यासक्रमात कपात होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यामुळे अधिक तास घेऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here