उद्या भारतीय नौदलात दाखल होणार INS विशाखापट्टनम
sakal_logo

द्वारे

दीनानाथ परब

मुंबई: भारतीय नौदलाला INS विशाखापट्टनमच्या (INS Visakhapatnam) रुपाने आणखी एक अस्त्र मिळणार आहे. प्रोजेक्ट १५ B वर्गातील ही पहिली युद्धनौका (War ship) आहे. INS विशाखापट्टनम ही स्टेल्थ गाईडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आहे. उद्यापासून ही युद्धनौका सेवेत रुजू होणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह INS विशाखापट्टनमच्या जलावतारणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

मुंबईत नेव्हल डॉकयार्डमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. “आयएनएस विशाखापट्टनमच्या जलावतारणासाठी आम्ही सज्ज आहोत. या युद्धनौकेच्या बांधणीत स्वदेशी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. जलावतारणानंतर आणखी काही चाचण्या होतील” असे कॅप्टन बिरेंद्र सिंह यांनी सांगितले. ते INS विशाखापट्टनमचे कमांडिंग अधिकारी आहेत.

हेही वाचा: दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन सुरुच राहणार

या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाची समुद्राच्या पृष्ठभागावर आणि पाण्याच्या आत मारा करण्याची क्षमता वाढणार आहे. INS विशाखापट्टनमच्या बांधणीमध्ये स्वदेशी स्टीलचा वापर करण्यात आला आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी ही युद्धनौका सज्ज असेल.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here