
महावितरण ने कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडणे म्हणजे विनाशकाले विपरित बुध्दी- बोडके
5 तासांपूर्वी
दिंडोरी : शेतकरी अडचणीत असताना महावितरणने कृषीपंपाची वीज तोडणी बंद करावी, शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज चालू ठेवावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी राहुल बोडके, सचिन जाधव, रमेश चौधरी यांनी दिला आहे. सध्या वीजवितरणकडून प्रत्येक वायरमनला गावात पाठवूनआलेले बिले भरणा करा अन्यथा डीपीवरील पुरवठा बंद करण्यात येईल असा धमकीवजा इशारा देण्यात येत आहे.
राज्य शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकरी व जनता वैतागलेली आहे. आधीच दोन वर्षांपासून शेतीत प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. अद्याप पीक विमा मिळालेला नाही. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे, त्याची अद्याप भरपाई मिळालेली नाही. मात्र उर्जा विभागाने चक्क वीज बील थकबाकीमुळे शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे कनेक्शन तोडण्या संदर्भात शासन निर्णय काढून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. वीज कनेक्शन पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिक व शेतकरी यांनी दिला आहे.
Esakal